डॉ.ज्योती विनायक मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश
मुंबई click2ashti शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ज्योती विनायक मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत आणखी रंगत वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ज्योती विनायक मेटे या शरद पवार यांच्या संपर्कात होत्या. परंतू पवार यांच्या गटात त्यांनी प्रवेश न करता लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार केला. परंतू ऐन वेळी मेटे यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. दरम्यान आज डॉ.ज्योती विनायक मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून पवार यांनी मेटे यांचे स्वागत केले आहे.