वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण नाहीच-उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंञी फडणवीस व विज कर्मचारी संघटनेची सकारात्मक चर्चा
मुबंई वृत्तसेवा-वीज कंपनीचे खासगीकरण करायचे नाहीच अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज केली.वीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर सहमती झाल्याचे ते म्हणाले.त्याशिवाय वीज कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाईल असेही त्यांनी आज स्पष्ट केले.वीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही माहीती दिली.
पुढे बोलतांना ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले,जवळपास 32 संघटना आज सरकारसोबत झालेल्या तोडग्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.यात तीन ते चार मुद्यांवर आमची सकारात्मक चर्चा झाली.राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही.या उलट तीन वर्षांत 50 हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार स्वतःकरणार आहे.त्यामुळे आम्ही खासगीकरण करणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.तसेच खासगीकरण नाहीच हे स्पष्ट आहे.