व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आता जरांगे फॅक्टरचा परिणाम होणार नाही

0

लातूर click2ashti मनोज जरांगे यांनी विधानसभेत उमेदवार देण्याची घोषण केली असली तरी आता जरांगे फॅक्टर चालणार नाही. उलट त्यांना राज्यातील एकूण २८८ जागांवर उमेदवार मिळतील का अशी परिस्थिती आहे, अशी टीका भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले की, सांगोला विधानसभा मतदारसंघावर आपण दावा केला आहे. मुळ भाजपच्या हक्काची असलेली सांगोल्याची जागा भाजपने 2009 मित्रपक्षाला दिली. मात्र आता पुन्हा या जागेवर भाजपने उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. दरम्यान,
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना 288 उमेदवार मिळणार नाहीत. सुपारी घेऊन उमेदवार पाडण्यास राज्यात मोगलाई लागली काय? अशा तिखट शब्दांत भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.