बीड click2ashti महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता महिनभराचा कालावधी राहिली असून मोठ्या प्रमाणात उमेदवार पक्षांतर करत आहेत. यातच आता राज्यातील पाच जागा ऊसतोड कामगार संघटनेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
या संदर्भात राज्यातील 9 ऊसतोड कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील बीडसह, आष्टी, चाळीसगाव, कन्नड आणि माजलगाव या पाच मतदारसंघातून ऊसतोड कामगार संघटना अपक्ष उमेदवार उभा करणार आहे. राज्यात जवळपास २२ लाख ऊसतोड कामगार असून एकट्या बीड जिल्ह्यात पाच लाखाच्या जवळपास संख्या आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post