निलेश राणे कमळ सोडले, हाती घेतले धनुष्यबाण
मुंबई click2ashti कोकणातील भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हातात शिवसेनेने धनुष्यबाण घेत कमळ सोडून दिले आहे. राणे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असून ते कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत.
राणे म्हणाले की, माझा निर्णय हा व्यक्तीगत आहे. भाजपमध्ये कोणाशी पटत नाही म्हणून मी निर्णय घेत नाही. उलट भाजपमध्ये मला प्रत्येक वेळी सन्मानाची वागणूक मिळाली. परंतू ज्या पक्षातून माझ्या वडिलांची म्हणजे नारायण राणे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्या पक्षात पुन्हा काम करण्याचे भाग्य मला मिळत आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. उद्या मी शिवसेनेत प्रवेश करणार असून कुडाळ मतदासरसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले.