व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत आज मुस्लिम बांधवांचा संवाद मेळावा

0

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि.23) आष्टी येथे मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,मतदारसंघात अल्पसंख्याक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आहेत.अनेकजण शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत.त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व समाजबांधवांनी लक्ष्मी लॉन खडकत रोड आष्टी येथे आज बुधवार (दि.23) रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते अजयदादा धोंडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.