आष्टी विधानसभाची “मनसे”कडून कैलास दरेकर यांना उमेदवारी जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी जाहीर
मुंबई click2ashti-विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून,सर्वच पक्षाने उमेदवारी जाहिर करण्यास सुरुवात केली आहे.नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील 39 उमेदवारांची यादी जाहिर केली.यामध्ये गेल्या 15 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले असुन आष्टी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे.पक्षाने व राजसाहेब यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून ह्या निवडणुकीत मनसेला यश मिळणार असल्याचे कैलास दरेकर यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.सोमवारी मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती.राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत रंगणार आहे.तर या दुस-या यादीत बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेची उमेदवारी कैलास दरेकर यांना तर गेवराई विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जयश्री म्हस्के यांना देण्यात आली आहे.