आष्टीच्या जागेचा सस्पेन कायम;आमदार आजबेंचा आजच्या यादीतून पत्ता कट…!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहिर
आष्टी click2ashti-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती आष्टी विधानसभा मतदारसंघाची आजच्या यादीत तरी बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहिर करत आष्टी विधानसभा आष्टीच्या जागेचा सस्पेन कायम ठेवत;आमदार आजबेंचा आजच्या यादीतून पत्ता कट झाल्याने मतदार संघात तर्क वितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांच्या या यादीमध्ये नवाब मलीक आणि सुनील टिंगरे, बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा समावेश नाही.तर विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.यात छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा येवला मतदार संघातून निवणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.वास्तविक राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातील वाद समोर आला होता. त्यामुळे आता या मतदार संघातून भुजबळ यांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असेल.तर दुसरीकडे राज्यातील विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे,अनिल पाटील,संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
विद्यमान आमदारांचा पत्ता कट?
अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर, तर पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहेत तर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांचे नाव समोर आल्यानंतर महायुतीला विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे आता अजित पवार या तिन्ही आमदारांचा पत्ता कट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.