महाविकास आघाडीकडून युवकांचा ढाण्या वाघ महेबुब शेख;उमेदवारी जाहीर होताच आष्टीत अतिष बाजी
आष्टी click2ashti-महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात इस्लामपूर येथून जयंत पाटील,काटोल येथून अनिल देशमुख,घनसांगवी येथून राजेश टोपे, मुंब्रा- कळवा येथून जितेंद्र आव्हाड, इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील,आष्टी मतदार संघातून महेबुब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या यादीनुसार स्वतः जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.या मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणुकीसारखीच हायव्होल्टेज लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा सामना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झाला होता.त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.तसेच आष्टी मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसून शरद पवार गटाने सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना उमेदवारी जाहीर केली.महेबुब शेख यांना उमेदवारी जाहिर होताच अतिष बाजी करण्यात आली.