व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तिकीट कुणाला देऊ नका,आम्ही तिघे अपक्ष निवडणूक लढू;हिंमत असेल तर अपक्ष निवडून येऊन दाखवा-सुरेश धस

0

आष्टी click2ashti-स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी हा आष्टी मतदार संघ १९९९ साली भाजपा-शिवसेना युती मधून शिवसेनेकडील असलेली जागा भाजपला घेतली आहे.आणि हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला केला आहे.आष्टी मतदार संघाची उमेदवारी पहिल्या यादीतच जाहिर होऊन,आपले नाव येणे अपेक्षित होते.परंतु वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला तो झाला आता आम्हा तिन्ही आजी-माजी आमदारांना पक्षाने उमेदवारी न देता अपक्ष लढविण्याची परवानगी द्यावी आणि निवडुनही येऊन दाखवावे असे आवाहन माजीमंत्री सुरेश धस यांनी आ.बाळासाहेब आजबे व माजी आ.भिमराव धोंडे यांना केले आहे.
दोन दिवसापासून सोशल मिडियावर आता राजकारणातून माघार अशी पोस्ट व्हायरल झाल्याने धसांचा कार्यकर्ता व्हायबल झाला होता.परंतु सुरेश धस हे मुंबई येथे असल्याने बाजू कळू शकली नव्हती‌.परंतु आज शुक्रवार (दि.२५)रोजी सुरेश धस निवासस्थानी असल्याचे समजताच धस समर्थकांनी सकाळी ८ वा.धस यांच्या निवास स्थानकाकडे धाव घेतली.अन् बघता-बघता हजारो कार्यकर्ते जमा झाले आणि “हामारा नेता कैसा हो..सुरेश आण्णा जैसा हो…!,कोण आला रे कोण आला.. बीड जिल्ह्याचा वाघ आला..! यासह आदि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.यावेळी आण्णा तुम्ही माघार घेवु नका,आपल्याला निवडणूक लढवण्याची मागणी केली.या उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलताना धस पुढे म्हणाले की,पहिल्या यादीत नाव यावं ही अपेक्षा होती.पक्षाच काम आत्तापर्यंत प्रामाणिक केले आहे.ज्या ठिकाणी भाजप निवडून येणार नाही अशा स्थानिक स्वराज्य संस्थेवर मी उभा राहिलो निवडून आलो माजी मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री यांनी सहकार्य केले.लोकसभेला देखील प्रामाणिक काम केले.2019 लोकसभा आणि आत्ताची लोकसभा कुणी प्रामाणिक काम केलं हे पक्षाने तपासाव.वाडी वस्ती तांड्यावर गेलो लोकांना मतदान करा म्हणून आवाहन केलं.बाकीच्यांनी कुठे सभा घेतल्या काय काम केलं याचा लेखाजोखा पक्षाला द्यावा.माझं काम लोकांना दिसतंय कुणाला सांगायची मला गरज वाटली नाही.संकटात लोकांना गरज असताना हे घरात गोधड्या घेऊन झोपले होते.कोरोणा काळात माझ्या दारात लोक मला भेटायला येत होते तेव्हा माझं दार 24 तास उघड होत.त्यावेळी आजी माजी कुठ होते.आता निवडणूक आली म्हणून जाती पातीच विष पेरायच काम सध्या इच्छुक उमेदवारांकडून केले जात आहे.माझ्या राजकीय जीवनात मी कधी कुणाची जात विचारली नाही.पण त्यात काम करणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला गोवल जातंय ही फार मोठी शोकांतिका आहे..माझ्यावर तुतारीला भेटायला गेलो असा आरोप केला जातोय.एक जण तुतरीकडे जाण्यासाठी 1 महिन्यांपासून उठ बशा काढत होते.आता म्हणतेत मी भेटलोच नाही आणि यात तथ्य नाही.तर दुसरीकडे एक जण मी सकाळी एकाला दुपारी एकला संध्याकाळी एकाला भेटलो असा डांगोरा पिटत आहेत.त्यामुळे अशा लोकांना बालिश बहु बायकात बडबडला…असेच म्हणावे लागेल.लाडकी बहिण कार्यक्रमाला 400 रुपये रोज देऊन महिला आनाव्या लागल्या.सगळं बोलणार आहे सगळं काढणार आहे मात्र 4 तारखे नंतर बोलायला सुरुवात करेन. 2019 ला स्वतःच्या चुकांनी पडले आणि आमच्यावर खापर फोडून कटप्पा बाहुबलीच्या जाहिराती कोणी दिल्या.मग त्या बाहुबलीला सांगू इच्छितो निवडणुकीच्या काही दिवसात लागलेल्या नगरपंचायत निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर कासार या तिन्ही नगरपंचायत कशाकाय माझ्या ताब्यात लोकांनी दिल्या.याच एकच कारण 24 तास तेवढं लोकांसाठी झिजाव लागतं.सुखात दुःखात जाव यावं लागतं.आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आष्टी विधानसभेच्या जागेवरून सुरू असलेला तिढा अजूनही सुटला नाही.आणि तो जर सुटत नसेल तर माझी महायुतीच्या प्रमुख नेत्यांना विनंती आहे,तोडगा निघत नाही ना तर मग या मतदार संघात घड्याळ देऊ नका,कमळ देऊ नका आम्हाला तिघांना स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या म्हणजे सुट्टा खेळ होईल.जो निवडून येईल त्याला त्याचा पक्ष स्वतंत्र वाहनाने मुंबईला घेऊन जाईल.अशी गर्जना करत सुरेश धस यांनी निवडणुकीत रंग भरला आहे.यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते निवासस्थानी आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.