आष्टी मतदारसंघात तुतारीच्या ढाण्यावाघाच्या स्वागताला तोबा गर्दी…!
आष्टी तालुक्यात महेबुब शेख यांचे जोरदार स्वागत जेसीबीतुन पुष्पवृष्टी, कार्यकर्तांचा जल्लोष
आष्टी click2ashti-राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेत्यांनी फिल्डींग लावली होती.परंतु पवार साहेबांनी गोलिगत खेळी करत महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना उमेदवारी जाहीर केली.उमेदवारी जाहिर झाल्यानंतर या आष्टी मतदारसंघात तुतारीच्या ढाण्यावाघाच्या स्वागताला तोबा गर्दी करत जेसीबीतुन पुष्पवृष्टी,कार्यकर्तांनी एकच जल्लोष केला.
आष्टी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत उमेदवारी महेबुब शेख यांना यांना काल जाहीर झाल्यानंतर आष्टी येथे कार्यकर्त्यांनी सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.शुक्रवारी सकाळी मतदार संघात महेबुब शेख यांचे धानोरा येथे आगमन झाले. ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करत धानोरा येथील चौकाचौकात रॅली काढून महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कडा येथे ही जोरदार स्वागत झाले आष्टी शहरात स्वागतासाठी जेसीबीतून महेबुब शेख यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात रॅली किनारा चौकापासून आण्णाभाऊ साठे यांना चौकात अभिवादन करून झाली पुढे,स्व.गोपीनाथ मुंडे चौकात मुंडे साहेबांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले आष्टी शहरातील सर्व चौकाचौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.यावेळी “महेबुब भाई तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है..! जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता यावेळी तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, सुनिल नाथ,विजय गाढवे, राहुल काकडे, दादासाहेब झांजे,दिपक होले, ॲड रिजवान शेख,नदिम शेख,नगरसेवक भिमराव गायकवाड, अंकुश खोटे,जिशान सय्यद,अमोल चव्हाण,भाऊसाहेब मेटे,संतोष सानप,अतुल शिंदे, तौफिक शेख,भैरव चव्हाण,सचिन गोंदकर,सोमनाथ निकाळजे,अंबादास पवार,राजेसाहेब निंबाळकर,सचिन पवार,लहू भवर,शिवाजी शेळके,दत्तात्रय कांबळे,फरमान शेख, माऊली कांबळे, सुधाकर भगत, सोहेल बेग,जमीर पठाण, अस्लम मोगल,जल्लाल शेख, हाफिज मोसिम सय्यद,मुजामिल शेख, अरबाज बेग, महम्मद शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने रॅली सहभागी झाले होते.