ठरलं फायनल-जनतेच्या विश्वासावर करणार धस उमेदवारी अर्ज दाखल
आष्टी click2ashti-विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रात Maharashtra महायुती,महाविकास आघाडीसह इतर सर्व पक्षांनी ब-यापैकी उमेदवार जाहिर केले मात्र आष्टी मतदारसंघातील महायुतीच्या उमदवारीचे भिजत घोंगडे कायम ठेवल्याने येथील जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला की भाजप ला या घोळामुळे आमदार बाळासाहेब आजबे,माजी आमदार सुरेश धस Suresh Dhas व माजी आमदार भिमराव धोंडे हे तिघेही मातब्बर नेते वेटींगवर असल्याने कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत.कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माजीमंत्री सुरेश धस यांचे फायनल ठरलं आणि उद्या सोमवार (दि.२८)रोजी शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.
एकीकडे विधानसभेचे वारे जसे जसे वाहू लागले आहे तस तसा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आपापल्या नेत्या प्रति उत्साह संचारत असल्याचे दिसून येत आहे मात्र उमेदवारीचं भिजत घोंगड अजूनही जसेच्या तसे असल्याने शेवटच्या क्षणात आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेने इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अबाधित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी असलेले राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाचे बाळासाहेब आजबे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले माजी मंत्री सुरेश धस व माजी आमदार भीमरावजी धोंडे Bhimrao Dhonde हे अद्यापही वेटिंग लिस्ट मध्येच असल्याचे चित्र आहे.भाजपाच्या Bhartiya Janata party जाहीर झालेल्या दोन्ही यादीमध्ये इच्छुक उमेदवारांची नाव नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाची अवस्था आहे त्यातच माजी मंत्री सुरेश धस हे सोमवारी दिनांक 28 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या पोस्ट घेतला सोशल मीडियावर social media मोठ्या प्रमाणावर होत असून ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणाची जय तयारी धस समर्थकांकडून केली जात आहे.त्यामुळे सुरेश धस हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना अपक्ष दाखल करतात की पक्षाचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.