व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आता दिल्ली प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे मिळणार ऑनलाइन तिकीटे

विक्री करण्यासाठी ऑनलाइन निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल

0

नवीदिल्ली वृत्तसेवा-केंद्राने प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांना साक्षीदार होण्यासाठी मान्यवर,अतिथींना ई- निमंत्रणे व सर्वसामान्यांना तिकिटांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी ऑनलाइन निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल Aamantran सुरू केले. सरकारचा ई-गव्हर्नन्स हा उपक्रम रक्षा राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राष्ट्रीय राजधानीत सुरू केला असून आता आता दिल्लीच्या प्रजासत्ताक,स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी ऑनलाइन पास मिळणार आहे.
अजय भट्ट यांनी या पोर्टलला डिजिटल इंडिया उपक्रमातील एक भाग तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ई-गव्हर्नन्स मॉडेलच्या संकल्पनेच्या दिशेने एक पाऊल असल्याचे म्हटले आहे,जे सोपे,प्रभावी,आर्थिक आणि पर्यावरणास अनुकूल प्रशासनावर आधारित आहे,असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
सर्वसामान्यांसाठीची तरतूद
हे पोर्टल प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या समारंभांना उपस्थित राहण्यासाठी भौगोलिक स्थानाची पर्वा न करता ऑनलाइन तिकीट खरेदी करण्यासाठी सामान्य लोकांच्या नियोजनासाठी सुविधा प्रदान करते.या प्लॅटफॉर्मवर मान्यवरांना आणि त्यांच्या पाहुण्यांना ऑनलाइन पास जारी करण्याची सुविधा तसेच सर्वसामान्यांसाठीची तरतूद आहे.
या उपक्रमाचा उद्देश
Aamantran पोर्टल संपूर्ण प्रक्रिया वापरकर्ता अनुकूल, पर्यावरण अनुकूल बनवेल आणि सरकार आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करेल.
Aamantran पोर्टलची वैशिष्ट्ये काय ?
सुरक्षिततेसाठी QR कोड-आधारित प्रमाणीकरण,
ईमेल,एसएमएसद्वारे पास,तिकिटांचे डिजिटल वितरण,रद्द न करण्यायोग्य आणि हस्तांतरणीय नसलेली तिकिटे,निमंत्रितांकडून स्वीकृती मिळविण्यासाठी पाससाठी RSVP पर्याय,भविष्यातील कार्यक्रमांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी इव्हेंट डेटा विश्लेषण.पोर्टलद्वारे ई-आमंत्रणांचा विस्तार करण्याव्यतिरिक्त,तिकिटांच्या खरेदीसाठी बूथ,काउंटर खालील ठिकाणी स्थापित केले जातील,जेथे संरक्षण मंत्रालयाद्वारे ऑनलाइन तिकिटांची सोय केली आहे असे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.