माजी आमदार निवृत्ती उगले यांचे निधन
आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघाचे दहा वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे कॉम्रेट विचारसरणीचे असलेले
ॲड.निवृत्तीराव उगले यांचे सोमवार (दि.२८)रोजी पहाटे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघाचे सन १९६७ ते १९७२ याकाळात मतदार संघाचे आमदार तर १९७४ ते १९८० या काळात ते विधान परिषदेचे आमदार राहिलेले माजी आमदार ॲड.निवृत्तीराव उगलेसाहेब यांचे सोमवारी पहाटे वयाच्या ९५ व्या.वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांनी कडा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन,भूविकास बँकेचे संचालक यासह अन्य शासनाच्या विविध समितीवर काम पाहिले.अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी अशी त्यांची ओळख होती.त्यांच्यावर आज सोमवार (दि.२८) आक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आष्टी बस स्थानक जवळ वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.