व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत महायुतीचे दोन उमेदवार;लेचापेचा नाही तुझं कमळ तर माझं घड्याळ-आ.बाळासाहेब आजबे

धसांनी आगोदरच जाहिर केले होते सुट्टे खेळा

0

आष्टी click2ashti-गेल्या पाच वर्षांत आपण मतदार संघात साडेतीन हजार कोटींचे विकास कामे आणली पण हे विकासकामे आडाअडी करणा-यांना दिसतील अशी,आरे या मतदारसंघात तुम्ही कमळाचे चिन्ह आणले पण हा बाळासाहेब आजबे पण राजकारणात लंकेचा पेचा नाही.या निवडणुकीत होऊन जाऊदे तुझे कमळ तर माझे घड्याळ असे जाहिर सभेत आमदार आजबे यांनी घड्याळाचा बी फॉर्म मिळाला असल्याचे जाहिर करत माजी आमदार सुरेश धस यांच्यावर जाहिरसभेत हल्ला चढविला केला आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज मंगळवार दि.29 रोजी भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ.आजबे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ दादा वनवे यांच्यासह शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब लटपटे,धैर्यशिल थोरवे,नवनाथ सानप,विठ्ठल नागरगोजे,पोपट शेंडे, विश्वास नागरगोजे,दिपक घुमरे,हारिभाऊ दहातोंडे,महादेव डोके नामदेव शेळके आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,गेल्या पाच वर्षात मतदारसंघात साडेतीन हजार कोटींचा भरघोस निधी आणला आणि हा जर त्यांना दिसत नसेल तर हे दुर्देव आहे.माजी आमदार व सध्याचे असलेले महायुतीचे उमेदवार यांनी फक्त कामे आडविण्याचे काम केले आहे.आणि असा आमदार तुम्हाला पाहिजे असेल आपली काहि हरकत नाही.मला पैसे खाण्यासाठी आमदार की नको मला या संधीचा सोनं करायचे आहे.मुळात यांना तालुक्याला पाणि आणायचेच नाही.फक्त देखावा करीत आहेत.पाणि आणायचेच होते तर पंधरा वर्षं काय केले असा सवाल आ.आजबे यांनी नसतांना केला.तसेच आमच्या कार्यकर्त्यांनच्या केसाला धक्का लागला तर मी खोडावर घाव घालीन असा इशाराही आजबे यांनी दिला.
२ वा २३ मिनिटांनी केली उमेदवारी जाहिर
आ.आजबे यांनी जाहिर सभा सुरू असतांनाच बरोबर २ वाजून २३ मिनिटांचे आपल्याला घड्याळाचा बी फॉर्म मिळाला असल्याचे जाहिर करून आपण आत्ता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.
धसांनी आगोदरच जाहिर केले होते सुट्टे खेळा
दरम्यान निवडणुक जाहिर होताच माजीमंत्री सुरेश धस यांनी महायुतीत उमेदवारीची गर्दी आणि चढाओढ पाहून माझ्यासहित तिघांनीही उमेदवारी अर्ज भरून सुट्टं खेळा आणि निवडून येऊन दाखवा असे आवाहन सुरेश धस यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.