संत बाळूदेव महाराजांची पुण्यतिथी निमित्त साप्ताहाची परंपरा धानोरा,साबलखेड व देविनिमगांवने कायम ठेवली-माजी आ.धोंडे
माजी आमदार भीमराव धोंडे यांचे प्रतिपादन
आष्टी click2ashti-तालुक्यातील धानोरा,साबलखेड व देवीनिमगाव येथील भाविकांनी संत बाळूदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालू ठेवली.त्याबद्दल खरोखरच ही बाब भाविकांच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार व माजी आ. भीमराव धोंडे यांनी देवी निमगाव येथे केले.
आष्टी तालुक्यातील धानोरा,देवी निमगाव व साबलखेड येथे संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप प्रत्येक वर्षी भाऊबीजेच्या दिवशी होत असतो.यावर्षी रविवार (दि.३)रोजी सकाळी वरिल तिन्ही ठिकाणी साप्ताहाची सांगता करण्यात आली.यावेळी माजी आ. भीमराव धोंडे यांनी देवी निमगाव येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी ते देविनिमगांव येथे बोलत होते.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संदीप मार्कंडे यांनी माजी आ.धोंडे यांचा सत्कार केला.याप्रसंगी शिवाजी पोफळे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,पं.स.सदस्य डॉ मनोज पाचे, विठ्ठल काकडे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना मा.आ.भिमराव धोंडे म्हणाले,संत बाळूदेव महाराज हे या भागातील महान संत होते.पाटोदा येथील भव्य इमारत असलेल्या शाळेला आपण संत बाळूदेव महाराज यांचे नाव दिले आहे. माझे व संत बाळूदेव महाराजांचे चांगले स्नेहाचे संबंध होते.या परिसरात त्यांनी चांगले धार्मिक कार्य केले आहे.त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळेच या भागातील ग्रामस्थांनी संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा कायम चालू ठेवली आहे. त्याबद्दल भाविकांचे कौतुक करायला पाहिजे.आष्टी तालुक्यातील धानोरा,साबलखेड, देवीनिमगाव येथे संत बाळूदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.हि चांगली परंपरा या भागातील नागरिकांनी जपली असल्याचेही माजी आ.धोंडे यांनी सांगितले.