व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांचा पाहणी दौरा

निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांची माहिती

0

आष्टी click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघा करीता निवडणूक निरीक्षक भुवनेश प्रतापसिंग,(भा.प्र.से),यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे.सोमवार दि.४ रोजी आष्टी येथील विश्रामगृह येथे मतदार संघातील नागरिकांना त्यांना काही माहिती द्यावयाची असेल,तक्रार असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आष्टी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ निवडणुक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये लालटनपुई वाँगचाँग (भा.प्र.से),निवडणूक निरीक्षक माजलगाव,गेवराई मो.क्रं.७४९८६ ७३८१६ भुवनेश प्रताप सिंग,(भा.प्र.से),निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) बीड,आष्टी मो.क्र.९२२६७ ७०३३९,सुनिल अंचिपका (भा.प्र.से),निवडणूक निरीक्षक,केज,परळी व मो.क्र.७४९८१ ४३१०९, मल्लिका सुरेश (भा.पो.से),निवडणूक निरीक्षक मो.क्रं. ८२६१०४७०३० बीड जिल्ह्यातील सर्व मतदार संघासाठी,कपील जोशी (आय.आर.एस) प्र निवडणूक निरीक्षक गेवराई,व माजलगाव,बीड (खर्च) मो.क्रं.७४९८६८८४४३,के.रोहन राज,(आय.आर.एस) निवडणूक निरीक्षक आष्टी,केज,परळी व (खर्च) मो. क्रं.८१८०८८५९१३ यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्याअनुषंगाने आष्टी विधानसभा मतदारसंघा करीता निवडणूक निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग,(भा.प्र.से),मो.९२२६७ ७०३३९ हे सोमवार दि.४ रोजी आष्टी येथील विश्रामगृह येथे येणार असुन,मतदार संघातील नागरिकांना त्यांना काही माहिती द्यावयाची असेल,तक्रार असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आष्टी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.