व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अन् कार्यकर्त्यांसह भिमराव धोंडे शिट्टी यांनी वाजवून केली प्रचाराला सुरुवात

0

आष्टी click2ashti-आष्टी विधानसभेची निवडणूक चौरंगी लढत होत असून,माजी भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना निवडणुकीत शिट्टी हे चिन्ह मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह शिट्टी वाजून प्रचाराला सुरुवात केली.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभामतदारसंघाचे माजी आ. भीमराव धोंडे हे अपक्ष उमेदवार म्हणून ‘शिट्टी’ या चिन्हावर आष्टी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यावर काही वेळातच आष्टी तहसील कार्यालयातील निवडणुक विभागककडून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात, त्यावेळी अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवत आनंदोत्सव साजरा केला तसेच जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय,अमर रहे,अमर रहे,मुंडे साहेब अमर रहे..तसेच आमदार भीमराव धोंडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है….”धोंडे साहेबांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. याप्रसंगी उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, या निवडणुकीत आपण सर्व ताकदीनिशी उतरलो आहोत.आपल्याला शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.दिनांक ६ नोव्हेंबर रोजी बुधवारी आष्टी येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे तरी आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील मतदारांनी,कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी या कार्यक्रमास प्रचंड संख्येने उपस्थित रहावे.याप्रसंगी युवा नेते अजयदादा धोंडे,माजी सरपंच बबनराव औटे,अज्जुभाई शेख,पांडुरंग गावडे,माजी सरपंच बाळासाहेब पवार,हरिभाऊ जंजिरे,रामदास बडे,किशोर खोले,विठ्ठलराव बनसोडे,अण्णासाहेब लांबडे,रिपाईचे तालुका अध्यक्ष अशोक साळवे,संभाजी जगताप,समदभाई पठाण,सदाशिव दिंडे,कुंडलिक अस्वर, बबनराव सांगळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group