उद्या होणा-या प्रचार शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भिमराव धोंडे
आष्टी click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष उमेदवार असून त्यांच्या जाहीर प्रचाराचा नारळ आष्टी येथे फोडण्यात येत आहे.या प्रचार निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरि येथील बाजार तळावर या सभेचे आयोजन करण्यात आले असून मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी प्रचंड संख्येने या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आष्टी येथील आण्णाभाऊ साठे चौक,लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनिमंदीर,कमानवेस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महावीर चौक,महात्मा फुले चौकातून बाजारतळ अशी रॅली काढण्यात येणार आहे.शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे.आपण २० वर्षे आमदार असताना आष्टी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे. कधीही जातीयवाद केला नाही.सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत.
सुरुवातीला १५ वर्षं आणि २०१४ ते २०१९ असे पाच मिळून वीस वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व करीत मतदारसंघासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकास केला आहे.मतदारसंघातील एकही गाव असे नाही की,त्या गावांसाठी निधी दिलेला नाही.विकासकामे करताना कधीही भेद केला नाही.त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गावागावात शाळा सुरू केल्या आहेत.ऊसतोड मजूर,शेतमजूर, शेतकरी,कष्टकऱ्यांची मुले,मुली शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करीत आहेत.प्रचाराचा शुभारंभ आज आष्टी येथे होत आहे तरी मतदारसंघातील बंधू व भगिनींनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.