व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मोदी सरकार दहा वर्षांत आश्वासन देण्यात दंग-खा.शरद पवार

आष्टीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महेबुब ला विधानसभेत पाठवा

0

आष्टी click2ashti-देशात सध्या मोदींची सत्ता असून हे सरकार फक्त आश्वासने देत आहे.पण एकाही आवाश्नाची पुर्तता करत नसल्याचे दहा वर्षाच्या काळात देशाने पाहिले आहे.आता लोकांचा सध्याच्या राज्य आणि केंद्र सरकारवर राहिला नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ शनिवार दि.९ रोजी सायंकाळी ६ वा.आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खा.बजरंग सोनवणे, महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख,रामकृष्ण बांगर,परमेश्वर शेळके,शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हाप्रमुख परमेश्वर सापते, प्रभाकर देशमुख, डॉ‌महेश थोरवे,शिवभूषण जाधव, गुलाबराव घुमरे,आण्णासाहेब चौधरी,आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे,बाप्पुसाहेब डोके,डॉ.शिवाजी राऊत,मिलींद आव्हाड, डॉ.नदिम शेख,राहूल काकडे,रिजवान शेख,यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना खा.पवार म्हणाले,या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पाणि आणणे आवश्यक आहे आणि ते आणण्यासाठी आपण पाणी प्रश्न व एमआयडीसी चार प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून मार्गी लावणार असल्याची ग्वाही तुम्हाला देतो.एक काळ असा होता बीड जिल्ह्याची माझी ओळख आष्टी तालुक्यामुळे झाली आहे.या मतदारसंघाने माजी आ.निवृत्ती उगले,भाऊसाहेब आजबे, लक्ष्मण जाधव यांना नेतृत्व करण्याची संधी मतदारसंघाने दिली.आता या मतदारसंघाने युवानेतृत्व महेबुब ला देऊन त्याने सांगितलेले दोन्ही प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही खा.शरद पवार यांनी सांगितले.खा.बजरंग सोनवणे म्हणाले,लोकसभेची पुनरावृत्ती आपल्याला या विधानसभा निवडणुकीत करायची आहे.आपल्या या मतदारसंघातील दहशत मिटवून टाकायची आहे.लोकसभेच्या निवडणुकीत सुध्दा आमच्या व्यासपीठावर कुणीही मोठा नेता नसतांना फक्त पवार साहेबांवर ठेऊन मला विजय केले आहे.सध्याचे सरकार शेतकरी,तरुण,कष्टकरी नाराज असल्याचे सांगत आपण येणा-या काळात आष्टी मतदारसंघात साखर कारखाना व एमआयडीसी करणार असल्याचा शब्द खासदार बजरंग सोनवणे यांनी यावेळी दिला.महेबुब शेख म्हणाले,येथे जमलेल्या सर्व समुदाय हा आष्टी मतदार संघातील असून पवार साहेबांवर प्रेम करणारा आहे.गेल्या पन्नास वर्षांत आमदारकी एकाने वीस वर्ष,एकाने पंधरा वर्षं सत्ता भोगली पण त्यांनी मतदारसंघात काहिच विकास केला नाही.पुढील काळात आमच्या मतदारसंघात एमआयडीसी,कारखाना हे दोन उद्योग सुरु करायचे आहेत.आपल्या दृष्टीने गडचिरोली हा दुर्गम भाग म्हणून ओळखत होतोत पण ह्यापेक्षा बेकार अवस्था आपल्या मतदार संघातील आहे‌.हुकूमशाही वर सत्ता येत नसल्याचेही महेबुब शेख यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल जगताप यांनी केले तर आभार राम खाडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.