व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भिमराव धोंडे यांची प्रचारात आघाडी; कड्यात रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

0

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ कडा शहरात काढलेल्या प्रचार फेरीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून कडा शहर शिट्टीच्या आवाजाने दणाणून गेले.
अपक्ष उमेदवार माजी आ. भीमराव धोंडे यांच्या प्रचार फेरीस कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मधून सुरुवात झाली. संभाजी चौकातून आण्णाभाऊ साठे चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,जुने बसस्थानक,सोनार गल्ली,मुख्य बाजारपेठ,राम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुढे आठवडी बाजारातून शिट्ट्या वाजवत ग्रामपंचायत मैदान,बसस्थानक मार्गे मौलाली बाबा दर्गा येथे आल्यावर मौलाली चादर अर्पण करुन दर्शन घेऊन जाहीर सभेत रुपांतर झाले.याप्रसंगी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की कडा शहरात अनेक समस्या आहेत.शहराचा विकास करण्यासाठी शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी सभापती साहेबराव मस्के,सुधीर ढोबळे,विनोद ढोबळे मुस्ताक पानसरे व इतरांची भाषणे झाली. यावेळी माजी सभापती नियामत बेग, पांडुरंग कर्डिले, सुधीर ढोबळे, सुनील मेहेत्रे,शहादेव खेडकर,सरपंच सावता ससाणे,उपसभापती नामदेव धोंडे,परमेश्वर खेडकर,बळीराम कर्डिले,लिंबराज कर्डिले,राजाबापु नलावडे,मधुकर शिरोळे बजरंग कर्डिले प्रविण मेहेत्रे,दीपक बोराडे,सागर अनारसे दादासाहेब हजारे, मोहन कर्डिले,सूर्यवंशी पाटील,चेअरमन श्याम सांगळे,मुश्ताक पानसरे,विनोद ढोबळे व इतरांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.