व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भाजपाचे माजी आमदार पिता-पुत्रांसह तालुकाध्यक्षांची भाजपातून हकालपट्टी..!

0

आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघाचे भाजपा नेते व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवल्याने आज भरतीय जनता पक्षाने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे व भाजपा आष्टी तालुकाध्यक्ष अँड.साहेबराव म्हस्के यांची भारतीय जनता पार्टीने हकालपट्टी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,भारतीय जनता पक्षाने दि.१० रोजीच्या अधिकृत पत्रात आपण भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी असून, पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे.आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून, आपली तात्काळ या पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्र भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.