अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांची प्रचारात आघाडी
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विविध गांवात काढलेल्या प्रचार फेरीस मतदारांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला असून अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचे चिन्ह असलेल्या ” शिट्टीचाच” मतदारसंघात जोरदार आवाज आहे त्यामुळे या निवडणुकीत भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारात बोलले जात आहे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.
प्रचाराच्या निमित्ताने धामणगाव शहरात प्रचार फेरी काढण्यात आली याप्रसंगी माजी सभापती साहेबराव म्हस्के, माजी सरपंच सुदाम झिंजुर्के, पं स.सदस्य रावसाहेब लोखंडे,माजी पं स. सदस्य अमोल चौधरी,सय्यद शहाबुद्दीन,माऊली पानसंबळ,सरपंच दादासाहेब जगताप,भगवान तळेकर यांच्या सह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.धामणगाव शहरात काढलेल्या प्रचार फेरी दरम्यान माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले.धामणगाव शहरात शिट्टीचाच आवाज घुमत होता.प्रचार फेरी नंतर संत वामणभाऊ मंगल कार्यालयात जाहीर सभा झाली.