आष्टी शहर “शिट्टी” च्या आवाजाने दणाणले..!
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ मुर्शदपुर व आष्टी शहरात सुमारे तीन तास प्रचार फेरी काढून संपुर्ण आष्टी शहर,विनायक नगर आणि मुर्शदपुर शिट्टीच्या आवाजाने दणाणून गेले.
मतदारसंघातील शिरूर,कडा,धामणगाव,लोणी,पिंपळा नंतर आष्टी मुर्शदपुर मध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.शिराळ फाटा चौकातील लिमटाका गणपतीचे दर्शन घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या फेरीस प्रारंभ झाला.माजी आमदार भीमराव धोंडे,युवराज अभयराजे धोंडे व इतर कार्यकर्ते मतदार आणि व्यापाऱ्यांना भेटून शिट्टी चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. प्रचार रॅली मध्ये माजी सभापती साहेबराव म्हस्के,युवराज अभयराजे धोंडे,माजी सरपंच संतोष चव्हाण,ॲड रत्नदिप निकाळजे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,विठ्ठलराव बनसोडे,आदेश निमोनकर,नगरसेवक अस्लम बेग,आस्ताक शेख,चेअरमन अरुण सायकड, बाबुराव कदम यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व्यापारी आणि ग्रामस्थांनी ठिकठिकाणी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले.रेणूका मातेचे मंदिर ट्रस्टच्या वतीनेही स्वागत करण्यात आले.आष्टी आणि मुर्शदपुर विकासासाठी मला विधीमंडळात पाठवणे गरजेचे आहे.सर्वत्र शिट्टीचाच आवाज घुमत आहे असे उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.