मतदारसंघातील दडपशाही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून मोडीत काढावी-भिमराव धोंडे
पाटोदा येथील सभेत धोंडे यांचा हल्लाबोल
आष्टी click2ashti-आष्टी मतदारसंघात काही लोक दादागिरी करीत आहेत पण लोकशाहीत दादागिरी चालत नाही. दादागिरी बंद करायची वेळ आली आहे,मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दडपशाही व दांडगाई बंद करावी असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा येथे भव्य सभेत केले.
अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव यांच्या प्रचारार्थ पाटोदा येथे भव्य रोड शो काढून जाहीर सभा झाली. पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली सुरुवात झाली.
रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली तेव्हा शेवट शिवाजी महाराज चौकातच होता.अशा एक किलोमीटरचा रोडशो होता. या रोडशोने पाटोदा येथील नागरिक अचंबित झाले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे हे होते.व्यासपीठावर सौ. दमयंतीताई धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे,माजी सभापती साहेबराव म्हस्के, जि. प. सदस्य रामदास बडे,रामराव खेडकर, माजी सभापती कीसनराव पवार, माजी जि.प.सदस्य अशोकराव सव्वाशे,माजी सभापती नियामत बेग, राजाभाऊ देशमुख,माजी सरपंच बाळासाहेब पवार, जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर, ॲड. सय्यद अश्रफ,
अभयराजे धोंडे, संजय कांकरिया, किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव औटे, राजपाल शेंडगे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, दिलीपराव म्हस्के, युवा नेते अशोक दहिफळे, राजकुमार हीवरकर,युवराज खटके,माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,अंकुश मुंढे, ॲड. सुधीर सोनवणे, देविदास शेंडगे व इतरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, नगर परिषद निवडणुकीत आम्ही त्यांना सहकार्य केले पण ते आमच्या कार्यकर्त्यांची अडवणुक करीत आहेत. गेल्या चार महिन्यापासून मी मतदारसंघात फिरुन लोकांशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहे. लोक सांगतात समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. पाटोद्यात फीरून पाहिले आहे मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. मी कधी कोणत्याही कामात भेदभाव केला नाही. मला सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे बाळकडू बालपणीच मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढला, तेव्हा लोक आम्हाला हसायचे. परंतू शेतकऱ्यांसह आम्ही दिल्ली गाठून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला. पैलवान राहुल आवारे व सईद चाऊस यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
मी आयुष्यात खोट्या तक्रारी कधी केल्या नाहीत आणि करणारही नाही. त्यामुळे मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझे चिन्ह असलेल्या शिट्टी समोरील बटन दाबून विजयी करावे
मला मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना मतदारसंघात राबवायची आहे. जलजिवन मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 2019 मध्ये माझ्यासोबत राहुन माझा विश्वासघात केला आहे. त्यामुळे या लबाड माणसाला मतदान करु नका.
माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, जलजीवनची कामे न करता बिले उचलली आहेत. अनेक ठिकाणी पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. आज मुंडे महाजनांच्या घराण्याला राजकारणातून नाहीसे करण्याचे काम काही लोक करीत आहेत. विरोधक म्हणतात डुकरांचा बंदोबस्त करु, ते राजकारणात आले तेव्हा हरणांचा बंदोबस्त करू असे म्हणाले होते तेव्हा त्यांनी सांगावे बंदोबस्त केला का ॽ त्यांचे व्याही अगोदर तुतारी कडे होते ते आज त्यांच्याकडे गेले आहेत. अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, विरोधकांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, कोणालाही त्रास झाला तर मला संपर्क करा. दुसऱ्या विरोधकांनी आपले वय पाहून धोंडे साहेबांवर टिका करावी. तुमचे जेवढे वय आहे त्यापेक्षा जास्त वर्षे साहेब राजकारणात आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी धोंडे साहेबांच्या शिट्टी चिन्हाला मतदान करावे. उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की, आजच्या सभेला आम्ही जामखेड, पाथर्डी येथून लोकं आणले नाहीत. आमचे प्रत्यक्ष मतदारसंघातील मतदार उपस्थित आहेत. पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खात्यात मी उपसभापती होण्या अगोदर एक रुपया शिल्लक नव्हता त्यावेळी हुले चेअरमन होते. मी उपसभापती झाल्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार नियमित होत आहे. आणि खात्यावर पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत. सर्वांगीण विकासासाठी वीस तारखेला भीमराव धोंडे यांच्या शिट्टीला मतदान द्यावे.
जि.प.सदस्य रामराव खेडकर यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे हे मुंडे कुटुंबीयांशी एकनिष्ठ आहेत.धोकेबाज आणि लबाड कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे.विधानसभेला आणि लोकसभेला आपल्याला धोका दिला.मतदान करताना मशिनवर वरुन शेवटी पहायचे शिट्टी चिन्ह दिसेल त्याला मतदान करणे. जि. प. सदस्य अशोकराव सव्वाशे यांनी म्हणाले की, ताईंनी सांगितले आहे बाह्या मागे सारणाऱ्यांना मत द्यायचे नाही. समजनेवालें को इशारा काफी है.जलजिवन योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांना मत दिले तर आ.पंकजाताईं मुंडे यांना जाईल पण दुसऱ्यांना मत दिले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाईल. त्यामुळे विचार करा. माजी सभापती नियामत बेग यांनी सांगितले की,सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे करणारे भीमराव धोंडे एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत. माजी सभापती किसनराव पवार यांनी सांगितले की,मी अकरा वर्षे पं.स. सभापती असताना माजी आ.भीमराव धोंडे यांना पाहीले आहे त्यांनी प्रचंड प्रमाणात विकासकामे केली.विकासकामे करण्याची शक्ती फक्त भीमराव धोंडे यांच्यातच आहे.
जि.प.सदस्य रामदास बडे यांनी सांगितले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आ.भीमराव धोंडे आणि लोकसभा निवडणुकीत आ. पंकजाताईं मुंडे यांचा पराभव केला आहे आता धोंडे मुंडे समर्थकांनी बदला घेण्याची वेळ आली आहे.काही लोकांनी भीमराव धोंडे यांच्या बॅनर वरील पंकजाताई मुंडे यांचा फोटो काढायला लावला तरी,ताई आमच्या हृदयात आहेत. आ. पंकजाताईचा आशिर्वाद आपल्या पाठीशी कायम आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.ॲड. सय्यद अश्रफ यांनी सांगितले की, विरोधक सांगतात आम्ही कोरोना काळात काम केले त्याचा गवगवा करीत आहेत.पण माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कोरोना काळात रुग्णांना भोजनाची सोय केली, गोरगरिबांना किराणा वाटप केले त्यांनी कामाचा कधी गवगवा केला नाही.
कार्यक्रमास काकासाहेब लांबरुड, झुंबर चव्हाण,राजाभाऊ देशमुख, विठ्ठलराव लांडगे,सरपंच सोमनाथ गायकवाड,आस्ताक शेख,पांडुरंग कर्डिले,बजरंग कर्डीले,नईम शेख,संजय धायगुडे, मच्छिंद्र शेळके,अमोल शेळके,सरपंच सावता ससाणे,चेअरमन दादासाहेब हजारे,बबन सांगळे,अफसर शेख,अनिकेत सानप, राहुल अडागळे,अंकुश सानप, सुनिल मेहेत्रे,सरपंच माऊली वाघ,शहादेव खेडकर,इक्बाल पेंटर,परमेश्वर खेडकर,माजी सभापती अनिल जायभाय,ठकाराम दुधावडे,चेअरमन अरुण सायकड,सरपंच बबनराव जायभाय,दादासाहेब विधाते,एम.एन.बडे,हादी शेख यांच्या सह महिला व ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी मनोगत अशोक दहिफळे, माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,युवराज खटके व इतरांची भाषणे झाली.उपस्थितांचे आभार माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी मानले तर सुत्रसंचलन निलेश दिवटे यांनी केले.