निवडणुक आयोगाने योग्य खुलासा न केल्यास करेक्ट कार्यक्रम करणार-सुप्रिया सुळे
आष्टी click2ashti-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रात गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.आष्टी विधानसभेत बॅलेट पेपरची गडबड केली असे काहि झाले असेल तर निवडणूक आयोगाने दखल घेऊन कारणे द्यावे जर योग्य उत्तर आले नाही तर मी स्वत:लक्ष घालून ही गोष्ट निवडणूक आयोगाच्या कानावर घालून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा खा.सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१५ रोजी सायंकाळी ६ वा.कडा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर खा.बजरंग सोनवणे,खा.निलेश लंके,माजी आ.उषा दराडे,महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख,सतिष शिंदे,परमेश्वर शेळके, प्रभाकर देशमुख, डॉ.महेश थोरवे, शिवभूषण जाधव, गुलाबराव घुमरे, आण्णासाहेब चौधरी, आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे, सुनिल नाथ,डॉ. शिवाजी राऊत, मिलींद आव्हाड, डॉ.नदिम शेख,राहूल काकडे,रिजवान शेख,अमोल राजे तरटे,रविंद्र ढोबळे,मिनाक्षी पांडुळे,यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या,बीड जिल्ह्याने लोकसभेला शरद पवार साहेबांच्या बरोबर असल्याचे दाखवून दिले आहे.मागच्यावेळेस जे उमेदवार निवडून दिले आणि ते पवार साहेबांमुळेच झाले आहेत.राम खाडे यांनी केलेली तक्रार बाबतीत खबरदारी म्हणून मी ही माहिती निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे. कारण,कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची फसवणूक होऊ नये अशी माझी प्रेमळ भावना आहे.मी यासंबंधी कुणावरही आरोप करत नाही. पण असे फोन येतात तेव्हा काळजी वाटते.सत्तेत असो किंवा विरोधात कारभार पारदर्शक झाला पाहिजे असे माझे मत आहे.विधानसभेचे उमेदवार महेबुब शेख म्हणाले,आजची सभा फक्त आष्टी तालुक्याची असून,आपल्या सभेला मैदान मिळाली नाही.म्हणून आपण मौलाली बाबांच्या सानिध्यात घेत आहोत.या मतदारसंघात एकही नेता एका पक्षात राहत नाही.आणि आपल्याला ह्यांच्या विरोधात निष्ठा आणि कष्ट या जोरावर मिळाली आहे.या प्रस्थापितांनी कधीही मतदार संघाच्या हिताचा निर्णय घेतला नसल्याचेही शेख यांनी सांगितले.