व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सुरेश धस चौथ्यांदा आमदार;तुतारी मुडणार,घड्याळाचे काटे बंद,शिट्टी ची हवा गुल…आष्टीत फुलणार कमळाचं फुल..!

0

आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघाची निवडणुकीत सतरा जणांनी आपले नशीब आजमावली यामध्ये चौरंगी लढत होणार असे गृहीत धरले होते.परंतु जनतेने मात्र यावेळेस पुन्हा चौथ्यांदा सुरेश धस यांना आमदार करण्याचे ठरवले असल्याचा अंदाज काल झालेल्या मतदानातून दिसुन येत आहे.यामुळे तुतारी मुडणार,घड्याळाचे काटे बंद,शिट्टी ची हवा गुल…आष्टीत फुलणार कमळाचं फुल..!अशी चर्चा सध्या मतदार संघातील गावा-गावात रंगली आहे.
आष्टी मतदार संघासाठी ३ लाख ८६ हजार ३५८ मतदारांपैकी २ लाख ८१ हजार ८८७ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी 72.96% मतदान झाले.यामध्ये पुरूष-2,05,356 पैकी 1,51,821 तर स्त्री-1,81,001 पैकी 1,30,066 मतदारांनी हक्क बजावला आहे.यानिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)तुतारी ने चांगलेच नाकीनऊ आणले तर महायुती कडून असलेले धस यांनी भाजपा तर बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर भिमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने महायुती फिस्कटली मात्र यावूळी या चार उमेदवारांसह सतरा उमेदवारांनी आपले आमदारकीसाठी नशिब आजमावले.एकंदरीत या चौघांपैकी सुरेश धस हेच चौथ्यांदा आमदार होणार असल्याचे या मतदारसंघातील जनतेने ठरविले असल्याचे झालेल्या मतदानातून दिसुन येते आहे.
(कृपाया-हा निवडणुकीत जनतेने दिलेला अंदाज आहे.निकाल 23 नोव्हेंबरला आहे.)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.