सुरेश धस पराभवाच्या छायेत;आष्टीत “शिट्टी”वाजण्याचा अंदाज
आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघाची निवडणुकीत सतरा जणांनी आपले नशीब आजमावली यामध्ये चौरंगी लढत होणार असे गृहीत धरले होते.परंतु मराठा गावांनी काहि प्रमाणात तुतारी तर कमळ व घड्याळ चालविले तर ओबीसी गावात शिट्टी ला प्राधान्य दिल्याने उद्याच्या निकालात सुरेश धस हे पराभवाच्या छायेत दिसत असल्याची चर्चा मतदार संघात होत आहे.
आष्टी मतदार संघासाठी ३ लाख ८६ हजार ३५८ मतदारांपैकी २ लाख ५६ हजार ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.यामध्ये प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)तुतारी ने चांगलेच नाकीनऊ आणले तर महायुती कडून असलेले धस यांनी भाजपाकडून तर बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)गट तर भिमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने महायुती फिस्कटली मात्र यावूळी या चार उमेदवारांसह सतरा उमेदवारांनी आपले आमदारकीसाठी नशिब आजमावले.एकंदरीत या चौघांपैकी मराठा गावांनी तुतारी चालवली व मराठा मतदार तीन ठिकाणी विभागल्याने सुरेश धस हे विजयासाठी अटी-तटीत आले आहेत.तर ओबीसी समाजाच्या गावांमध्ये जास्तीच्या प्रमाणात भिमराव धोंडे हे सरस ठरले असल्याची चर्चा असून उद्या होणा-या मतमोजणीत सुरेश धस हे पराभवाच्या छायेत दिसत असून मतदारसंघात शिट्टी वाजण्याचा अंदाज दिसून येत आहे.
(कृपाया-हा निवडणुकीत अंदाज आहे.निकाल 23 नोव्हेंबरला आहे.)