व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धोंडे साहेब डी.बी.राऊतला आवरा,नाहीतर..! आमदार सुरेश धस यांचा भरसभेत गंभीर आरोप

0

आष्टी click2ashti-या मतदारसंघात स्वतःला शिक्षणमहर्षी म्हणून घेणा-या भिमराव धोंडे यांनी आपल्या संस्थेचा कारभार होण्यासाठी ठेवलेल्या डी.बी.राऊतचे काय धंदे चालले आहेत.हे पाहून घ्यावे,जर मी या शिक्षण संस्थेतील घडत असलेला प्रकार बाहेर काढला तर धोंडे साहेब आपली पळता भोई थोडी होईल असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी भर सभेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजय सभेत आमदार सुरेश धस बोलत होते.मतदार संघातील लोक जाती-पातीचे राजकारण करत नाहीत पण तुम्ही जातीचे राजकारण करतात.आपल्या शिक्षण संस्थेचा कारभार तुम्ही डी.बी.राऊत यांच्याकडे दिला पण ते कशा पध्दतीने घालवितात.गोरगरीबांच्या लेकरांना कसा त्रास देतात.तुमच्या महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थींनी सुरक्षित आहेत का?हे एकदा पाहावे आणि भिमराव धोंडे यांनी आत्तापर्यंतचे आयुष्य झोपण्यात घालविले आहे जर तुमचे कारनामे बाहेर काढले तर उर्वरित आयुष्य झेलात जाईल असा इशाराही आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.