व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“शिट्टी”वाजवा हा पंकजाताईंचा निरोप व्हिडिओ व्हायरल…!

0

आष्टी click2ashti-शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच आष्टी मतदार संघामध्ये प्रचारा दरम्यान पडद्यामागे झालेल्या घडामोडी आता समोर येताना पहावयास मिळत आहेत.विजयी सभेत आ.सुरेश धस यांनी आ.पंकजा मुंडे यांनी विरोधी भूमिका घेतल्याने मला त्रास झाल्याची खदखद बोलून दाखविली.
दरम्यान रविवारी दिवसभर आष्टी मतदार संघात पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले रामदास बडे,रामराव खेडकर यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांची मतदानाच्या काही दिवस अगोदर एक बैठक संपन्न झाली.त्या बैठकीत त्यांनी सुरेश धस यांना पाडा,ओबीसींना एकत्र या शिट्टी वाजवा असा संदेश देणारा तो व्हिडिओ असून पुढे यामध्ये आपण भाजपाचे नसून पक्षाशी आपल्याला काही देणे घेणे नाही आपण फक्त पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहोत आणि लोकसभेला जे ताईंच्या पराभवाला कारणीभूत आहेत अशांना आता आपण एकजूट दाखवून पराभूत करण्याची खूणगाठ बांधा आणि माजी आ.भीमराव धोंडे यांच्या शिट्टीचे काम करा असा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असल्याने शनिवारी आ.धस यांनी त्यांच्या मनातील बोलून दाखविलेली मनातील खंत म्हणजे हा व्हिडिओ असून कुठेतरी आता धस यांच्या भूमिकेला दुजोरा मिळत असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.