मागील काळातील रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करावीत;आमदार सुरेश धस यांची विकास आढावा बैठकीत सूचना
शासकीय अधिकाऱ्यांनी कामाबाबत सकारात्मकता दाखवावी
आष्टी click2ashti-सन 2014 पासून आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे रखडली असून या कामांना प्राधान्याने गती देऊन ही कामे पूर्ण करावीत..यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कामात सकारात्मकता दाखवावी विकास कामे करताना कोणताही भेदभाव न ठेवता कठोर भूमिका ठेवून काम करा तुम्हाला काम करताना काही अडचणी आल्यास मी तुमच्या पाठीमागे खंबीर उभा आहे मात्र तुम्ही देखील आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सतर्क रहावे अशा सूचना नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील सर्व खाते प्रमुखांच्या विकास आढावा बैठकीमध्ये दिल्या.
आष्टी पंचायत समिती सभागृहात शनिवार दि.१४ रोजी दुपारी १ वा.आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ.सुरेश धस बोलत होते.या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी वसिमा शेख यांच्यासह आष्टी तहसिलदार वैशाली पिटील,पाटोदा तहसिलदार दत्तात्रय निलावाड,तसेच आष्टी,पाटोदा,शिरूरचे
गटविकास अधिकारी,दुय्यम निबंधक,पोलीस निरीक्षक,गटशिक्षण अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,पाटबंधारे,बांधकाम,ग्रामीण पाणीपुरवठा, पाटबंधारे,या विभागांचे उप अभियंता आणि इतर सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले,
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव हा माझा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये वरदान ठरणारा प्रकल्प आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आवश्यक त्या गतीने कामे झाली नाहीत ती आता तातडीने पूर्ण करावयाची आहेत पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील असलेले सिंदफणा मध्यम प्रकल्प,उखळवाडी कारेगाव पांगरी जाधववाडी या तलावांची उंची वाढवण्याचे काम 2014 पासून रखडलेले आहे.ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले संयुक्त मोजणी आणि इतर कामे संबंधिताने तातडीने करावीत.पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादनाची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे असंतोष आहे.या कामी तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून शिरूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठा घोटाळा असून त्याची चौकशी करून या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आष्टी तालुक्यातील ठोंबळ सांगवी आणि गहूखेल येथील प्रकल्पाचेही काम 2014 पासून रखडलेले आहे या प्रकल्पांचे संयुक्त मोजणी अहवालाचे गावामध्ये जाहीर वाचन करण्यात यावे.
गोरगरीब शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे लवकर मिळतील याकडे लक्ष द्यावे.आष्टी तालुक्यातील 46 किलोमीटर अंतराच्या गावांमधून जाणारा सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावरील 19 गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाबाबत तक्रारी प्राप्त आहेत त्याची देखील शहानिशा करून या रस्ता कामाच्या संयुक्त मोजणी अहवालाची चौकशी करण्यात यावी. अशी त्यांनी मागणी केली शासनाच्या विकास कामांमध्ये स्वार्थासाठी आड येणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करावेत असे सांगितले.
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता ठेवावी खाते प्रमुखांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सिजेरियन मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळाला होता.परंतु अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण कमी झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या जलजीवन योजनेअंतर्गत सर्वात जास्त योजना आष्टी मतदार संघात असून अधिकाऱ्यांनी या सर्व योजना दर्जेदार करून नळाद्वारे नागरिकांना पाणी मिळावे ज्या कामांमध्ये हलगर्जीपणा झाला आहे ते काम पूर्ण करून घ्यावे निधीची काळजी करू नका मी निधीची व्यवस्था करतो तुम्ही मात्र कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करा अशा सूचना दिल्या आष्टी येथील खाजगी कोचिंग क्लासेस आणि कन्या शाळा परिसरातील रोड रोमि यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी दामिनी पथक तयार करून प्रभावी पद्धतीने या रोड रोमिओ वर कारवाई करावी असे सांगून आपल्या हद्दीतील हातभट्टी ताडी अमली पदार्थ विक्री होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्याचे सांगितले.सध्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुरेसा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने वीज वितरण विभागाने तातडीने सर्वेक्षण करून किती ट्रान्सफॉर्मर्स लागतील याची माहिती द्यावी शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि नियमित वीज उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.त्याचबरोबर आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शैक्षणिक गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार असून यासाठी तात्कालीन विभागीय आयुक्त व्ही रमणी पॅटर्न सुरू करण्यात येणार असून गोरगरीब शेतकरी शेतमजुरांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी हा पॅटर्न राबविण्यात येणार असून,त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व गट विकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी आणि तज्ञ शिक्षकांची मदत घेण्यात यावी अशी ही सूचना त्यांनी यावेळी केली.