व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

0

नवी दिल्ली click2ashti-भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली.त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.
मात्र, मनमोहन सिंग यांचे कुटुंब, काँग्रेस किंवा रुग्णालयाकडून माजी पंतप्रधानांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.पण,रॉबर्ट वाड्रा,पप्पू यादव,मनोज झा,सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या निधनाबद्दल X वर पोस्ट केली आहे.पण, कर्नाटकातील बेळगावी येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक रद्द करण्यात आली आहे.याशिवाय 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.राहुल गांधी Rahul Gandhi आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे Mallikarjun kharge बेळगावीहून दिल्लीला रवाना झाले आहेत.एम्सच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रियंका गांधी एम्समध्ये पोहोचल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.