संतोष देशमुख कुटुबियांना न्याय नाही मिळाला,तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागणार-मनोज जरांगे
सुरेश धस अण्णाच काफी है !
बीड click2ashti-केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना अटक करावी,अशी जनतेची मागणी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.सरकार गोरगरिबांना न्याय देणार की नाही? असा सवालही त्यांनी केला.तुम्ही जातीयवादी मंत्री सांभाळून संतोष देशमुख कुटूबीयांना न्याय देत नसाल,तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागतील,असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये निघालेल्या मोर्चात खासदार बजरंग सोनवणे,आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एका सुरात या प्रकरणी वाल्मीक कराड याला अटक करण्याची व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.पुढे बोलतांना जरांगे म्हणाले,संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेची आहे. जनतेची जी मागणी आहे तीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हवी, असे मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही त्यांच्यासोबत चहा प्यायला लागले तर गुंडगिरी कशी कमी होणार? असा सवालही मनोज जरांगे यांनी केला. तुम्ही गुंडगिरीला बळ द्यायला लागले आहेत. तुम्ही आल्यापासून हे पूर्ण दबायला पाहिजेत, हे तर जास्तच सक्रीय झाले, असा घणाघात मनोज जरांगे यांनी यावेळी केला. सरकारला गुंडच पोसायचे असून हे राज्य वेगळ्या दिशेने न्यायचे असल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.
आरोपीला मदत करणाऱ्या मंत्र्यालाही आत घ्या
आम्ही खवळलो तर आम्हाला नावे ठेवू नका. या राज्यात सरकार पक्षाला, किंवा जातीवादी मंत्र्यांना विध्वंस घडवायचा असेल, पण आम्हाला घडवायचा नाही. आमदारांनी जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत बोलावे, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली. ज्या नेत्याने, मंत्र्याने आरोपीला मदत केली, त्यालाही आत घ्या. विरोधी पक्ष नेत्याला, मंत्र्याला अटक करायची असेल तर राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच आहे. त्या बिचाऱ्याला काम होईल, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी टीकाही केली. मराठा समाजाच्या बाजुच्या माणसाच्या बाजुला मी आणि समाज कायम राहणार.मग तो कुठल्याही पक्षाचा असला,तरी आम्ही त्याच्यासोबत राहणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

सुरेश धस अण्णाच काफी है !
मी काय करतो?काय करणार? यापेक्षा समाजाने काय ठरवले हे महत्त्वाचे आहे.मी हटणार नाही,मी मागे सरकणार नाही.अण्णा बोलता बोलता म्हणाले तुम्हाला ट्रोल करत होते,तेच मला ट्रोल करत आहेत.पण मी सांगेन की,मला ट्रोल करणाऱ्यांना मी घोडे लावत होतो.अन्याय केला तर मी सोडत नाही,जहागिरदाराची औलाद असली तरी,अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी इशारा दिला.पुढे बोलताना जरांगे म्हणाले,मला काहीजण म्हणतात की तुम्ही कुणाचे नाव घेत नाही,तर काही जण म्हणतात लढत नाही.कोणत्या बैठका घेता, कसल्या बैठका घेता असेही विचारतात.सुरेश धस अण्णाच काफी आहे.