आमदार संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण
बीड-शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.हिंगोलीतील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे.
सदरील व्हिडीओ 3-4 दिवसांपूर्वीच्या घटनेचा असल्याची माहिती आहे.व्हिडिओत हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर हे मारहाण करत आहेत.संतोष बांगर यांनी प्राचार्यांचा कानच पकडला आहे. केवळ आमदार संतोष बांगरच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्राचार्यांचा कान पकडत त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
आमदार बांगर यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्याला मारहाण का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार संतोष बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्यांचे नाव आहे.डॉ. अशोक उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात,असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे.मात्र,यावर अद्याप संतोष बांगर यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.