तिरूपती बालाजी येथे तिकीट काऊंटर वर चेंगराचेंगरी;एका महिलेसह चौघांचा मृत्यू
आंध्रप्रदेश click2ashti-आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. दीडशेहून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
प्रत्येक्षात चार हजारांहून अधिक भाविक काउंटरजवळ रांगेत उभे होते. त्याचवेळी बैरागी पट्टिडा पार्कवर भाविकांना रांगा लावण्यास सांगण्यात आले.पुढे जाण्याच्या शर्यतीत गोंधळ उडाला.लोक एकमेकांवर चढले.यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला.मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती घेतली.
