व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

चल गं सखे..चल गं सखे खुंटेफळ ला…! आमदार धसांचे मोटारसायकल वर जोडीने येण्याचे आवाहन 

0

आष्टी click2ashti-ना भुतो,ना भविष्यात असा मोठा कार्यक्रम आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असून,यासाठी आष्टी मतदारसंघातील सर्व चारचाकी वाहने बुक झाल्याने आता कार्यक्रमासाठी मतदारसंघातील नागरिकांनी सकाळ-सकाळ आपल्या मोटारसायकल वर जोडीने चल गं सखे..चल गं सखे खुटेफळ ला…! असे म्हणत उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.  
मतदारसंघातील खुंटेफळ येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा क्र.3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामांची पाहणी तसेच बोगदा भुमिपुजन बुधवार दि.5 रोजी सकळी 11 वा.होणार असून या कार्यक्रमाचे आष्टी शहरातील व्यापा-यांना नियत्रंण देण्यासाठी शनिमंदीर येथे सकाळी ११.३० वा.आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार सुरेश धस बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,खुंटेफळ साठवण प्रकल्प माझा ड्रिम प्रोजेक्ट होता.या पाण्याने फक्त आष्टी तालुकाच नाहीतर संपुर्ण मतदार संघ पाणिदार होणार सर्व मतदार संघातील जमिन ब-यांपैकी पाण्याखाली येणार आहे.त्यामुळे आपण आपला मतदार संघ सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच बाहुबली मुख्यमंत्री यांनी मार्गी लावला आहे.या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा क्र.3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामांची पाहणी तसेच बोगदा भुमिपुजन बुधवार दि.5 रोजी सकळी 11 वा.होणार असून या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार या कार्यक्रमास मतदारसंघातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
हा माझा ड्रिम प्रोजेक्ट-आमदार धस
सन-२००५-०६ मध्ये सुरूवातीला मी खुंटेफळ साठवण तलावाचे काम हाती घेतल्यानंतर सुरूवातीला मला मतदार संघातील नेत्यांनी विरोध करत हा प्रोजेक्ट होणार नसल्याचे सांगत नागरिकांना माझ्या विरोधात चुकीची माहिती दिली.परंतु कालांतराने हा प्रकल्प पुर्णत्वास जात असताना सर्वच मतदार संघातील नेत्यांनी संधी घेण्याची सोडली नाही.आज या प्रकल्पाच्या कामांची पाहणी व बोगदा कामाचे भुमिपुजन करण्यासाठी राज्याचे बाहुबली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असून,हा मतदार संघ सुजलाम सुफलाम होत असलेल्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.