आष्टी बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद, व्यापाऱ्यांसह नागरिक खुंटेफळला रवान
आष्टी click2ashti-गणेश दळवी-आष्टी-पुढच्या पंचवीस पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून आष्टी मतदारसंघाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमास आष्टी शहरासह कडा,धानोरा,धामणगांव,पाटोदा,कुसळंब हे व्यापारपेठेचे गावे व्यापा-यांनी आपले दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेऊन खुंटेफळ येथील प्रकल्पाच्या सोहळ्यास उपस्थितीची लावल्याने व्यापार पेठ ओस पडल्याचे दिसत होते.
आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा क्र.3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामांची पाहणी तसेच बोगदा भुमिपुजन बुधवार दि.5 रोजी सकळी 11 वा.होणा-या कार्यक्रमास आष्टी,पाटोदा,कडा,धामणगाव, धानोरा,दौलावडगांव,कुसूळंब यासह सर्व शहरातील व्यापा-यांनी आपले दुकाने बंद ठेऊन या कार्यक्रमास हजेरी लावल्याने सर्व बाजारपेठ शुकशुकाट दिसून येत होता.
गेल्या पंधरा वर्षापुर्वी आमदार सुरेश धस हाती घेतलेला खुंटेफळ साठवण तलावाचा ड्रिम प्रोजेक्ट आज पुर्णत्वास जात असून, या प्रकल्पाचा फायदा पुढील पंचवीस पिढ्यांसाठी होणार आहे.त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आवाहनाला व्यापारी,नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपले व्यावसाय बंद ठेऊन या कार्यक्रमास हजेरी लावली होती.
भाजीपाला विक्रेते व शेतकरी ह्यांनी पण लावली हजेरी
आष्टी शहरात दररोज भरत असलेली भाजी मंडई तील विक्रेते आणि दररोज भाजी विकण्यासाठी येत असलेल्या शेतकरी बांधवांनीही आज या ठिकाणी हजेरी लावल्याने भाजी मार्केट मध्ये शुकशुकाट दिसत होता.