आ.धस यांच्या माध्यमातून मतदारसंघ पाणीदार करणार : मुख्यमंत्री फडणवीस
click2ashti-गणेश दळवी आष्टी-वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आणि हा भाग पाणिदार बनविण्यासाठी सुरेश धस यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून हा मतदारसंघासह दुष्काळमुक्त करणार असून,बीड जिल्ह्यातील झालेल्या स्व.संतोष देशमुख यांचा कोणत्याच आरोपींना मोकाट सोडणार नसल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा क्र.3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामांची पाहणी तसेच बोगदा भुमिपुजन बुधवार दि.5 रोजी दुपारी 2 वा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ना. फडणवीस बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पर्यावरणमंत्री ना.पंकजा मुंडे,महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार बजरंग सोनवणे,आमदार प्रकाश सोळंके, आ.नमिता मुंदडा,आ.विजयसिंह पंडित,आ.संदिप क्षिरसागर,आ.नारायण पाटील,माजी आ.भिमराव धोंडे,रेशमी बागल,वफ्क बोर्डाचे अध्यक्ष समिर काझी,माजी आ.लक्ष्मण पवार,माजी आ.साहेबराव दरेकर,जलसंपदाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर,कार्यकारी संचालक संतोष तिरमनल,विजय घोगरे, नगराध्यक्ष जिया बेग यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,मी मुख्यमंत्री झालो तेव्हा 23 टिएमसी पाणि मराठवाड्याला मिळणार होते पण प्रत्येक्षात फक्त 7 टिएमसीच पाणि शिल्लक असल्याचे दिसून आले.आणि 2022 मध्ये मी जलसंपदामंत्री झाल्यानंतर सर्वात आगोदर मी सुप्रमा दिली ती या प्रकल्पासाठी 11 हजार कोटींची दिली.कारण माझ्याकडे सुरेश धस पाठपुरावठ्यामुळे द्यावीच लागली कारण धस मागे लागले म्हणजे विषयच नसतो.आता आपल्याला आष्टी तालुकाच नाही तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळ मुक्त करायचा असल्याचे सांगत वाहून जाणारे 53 टिएमसी पाणि गोदावरीमध्ये आणले तर पुढची कोणतीच पिढी मराठवाड्यातील दुष्काळ बघणार नाही.आता आपण नदीजोड प्रकल्पावर भर दिली असुन त्याची टेंडर प्रक्रियाही पुर्ण होऊन येत्या वर्षभरात गोदावरी खो-यात पाणि सरकार आणणार आहे.उपसा सिंचन योजना म्हणलं की त्याला खुप विज लागते पण हि योजना आपण सोलरवर टाकणार असल्याने शेतक-यांना त्रास होणार नाही.महाराष्ट्र हे पहिले राज्य असे आहे की,2027 पर्यंत बाराही महिने दिवसा वीज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंपदाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर यांनी करत हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर आत्ता पर्यंत 550 कोटी खर्च झाले असून 1300 कोटी रूपये खर्च करायचे आहेत.जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, दुष्काळ ग्रस्त भागाला संधी देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे.तसेच या मतदार संघातील जनतेसाठी आपलं काहिच झाले तरी प्रश्न मार्गी कसा लावायचे याचे नियोजन करणारा नेता म्हणजे सुरेश धस होय,या प्रकल्पाचे दोन टप्प्यांत कामे करायचे आहे आणि आज पहिला टप्प्याचे काम आता पुर्ण झाला आहे.जर दोन्ही टप्प्याचे काम पुर्ण झाले तर 33 हजार हेक्टर ओलिताखाली येणार आहे.आणि मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प जेवढ्या वेळात पुर्ण करायचा आहे.त्या कालावधीपेक्षा कमी वेळेत हे काम पुर्ण करणार असल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
ना.पंकजा मुंडे म्हणाल्या,मेरा वचन,मेरा शासन हे आमच्या रक्तात नाही,आम्हीही इज्जत देतोत आत्ताच्या सभेत आमदार धस यांनी 2003 चा सैनिकी चालण्याचा किस्सा सांगितला.आणि या ठिकाणी सैनिकी छावण्या करायचा नाही आणि येथे शेतक-यांसाठी प्रकल्प करायचा असे स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले.मी विकासासाठी मला पत्रिका नाव असून किंवा नसो मी विकासासाठी कुणाच्याही बॅनरवर फोटो नसला तरी मी येणार म्हणजे येणारच आणि विकास कामांसाठी कधीही मागे वाटणार नसल्याचे ना.पंकजा मुंडे यांनी सांगितले.आमदार सुरेश धस म्हणाले,दि.23/8/2007 ला या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली आणि 13/1/2009 रोजी सर्व्हेक्षण केले आणि त्या सर्व्हेक्षणाच्या वेळी 400 लोकं दगडं घेऊन मागे लागले होते.आज या कामासाठी अजित पवार,पंकजा मुंडे,माजी खा.प्रितम मुंडे,माजी मंत्री रामदास कदम यांचे सहकार्य लाभले आहे.मी 2014 ला पराभुत झालो त्यानंतर 10 वर्षात फक्त तलावाचे भिंतीचे काम फक्त दोन टक्केच काम झाले असल्याचे आमदार धस यांनी सांगत तुम्ही सत्तेत आल्यानंतर 23 टक्के या तलावाचे काम पुर्ण केले आहे.तसेच आम्हाला फक्त जे काहि आमच्या मतदारसंघाला भरपुर देण्याची दानत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात आणि आमची अपेक्षा पण दुसरी कुणाकडून नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.दिवार चित्रपटाचा डॉयलॉग सांगत माझ्याकडे काहि नसले तरी चालेल पण मला मंत्रिपद नको,
पालकमंत्री पद नको आणि मला फक्त मतदार संघाला 4.68 टिएमसी आणि 3.5 टिएमसी पाणि द्यावे आणि माझ्यामागे देवेंद्र बाहुबली असल्याचे सांगितले.
माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले,गेल्या अनेक वर्षांपासूनच हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गी लावण्यासाठी काम हाती घेतले असून ह्या प्रकल्पात 4.68 टिएमसी पाणि मिळाले तर हा मतदारसंघच सुजलाम सुफलाम होईल.तसेच या मतदार संघ हा भौगोलिक भाग हा आमचा तालुका हा नगर जिल्ह्यात आहे.फडणवीस साहेबांनी भविष्यात आमचा तालुका नगर जिल्ह्यात जोडावा अशी मागणी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी केली.कडा सहकारी साखर कारखानाचे माजी चेअरमन विष्णुपंत चव्हाण म्हणाले,या प्रकल्पासाठी आमदार सुरेश धस जिवाचे रान करून मंजूर करत पाणी आणले आणि आता या मतदारसंघात कारखाना मंजूर करून द्यावा अशी विनंती ही चव्हाण यांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविणा गंधाडकर,बाळासाहेब तळेकर,निलेश दिवटे यांनी केले तर आभार माऊली जरांगे यांनी मानले.
क्षणचित्रे
* कार्यक्रमास सकाळी 9 वाजल्यापासूनच लोकांची येण्यास सुरुवात
* कार्यक्रमास मुख्यमंत्री 11.55 येणार होते ते मात्र 1.20 वा.कार्यक्रमस्थळी विराजमान झाले.
* कर्यक्रमस्थळी 1 वा.23 मिनिट ते 1 वा.32 मिनिटापर्यंत आल्यानंतर सुरूवातीला ना.मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजा करत कळ दाबून बोगदा * कामांचा शुभारंभ व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
* दुपारी 1.33 मिनिटांने दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
* आमदार धस यांनी ना.पंकजा मुंडे आणि माजी आ.भिमराव धोंडे स्वागत केले.
* या खुंटेफळ साठवण तलावासाठी ज्या शेतक-यांनी जमिनी दिल्या त्या शेतक-यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले.
* काहि नेते म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते पण याच जिल्ह्याने कर्तबगार नेते घडविले असल्याचे आ.सुरेश धस यांनी ना.पंकजा मुंडे यांना लगावला
आहे.
* संतोष देशमुख च्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भुमिका घेतली व राख,वाळू,भूमाफिया यांना पण मोकाका लागला पाहिजे अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली.
* 2019 पासुन माझ्यावर आरोप प्रत्यारोप करत मला अडकावण्यासाठी प्रयत्न केला पण तुम्ही माझ्यापाठिशी मुख्यमंत्री हे दत्त म्हणून उभे राहिलात.
* राष्ट्रवादी कॉग्रेसचा खासदार निवडणुकीत भाजपाचा उमेदवाराचा पराभुत केले म्हणाले तरी कार्यकर्ते जोरात ओरडणारे हे आमदार धस यांचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
* आमदार सुरेश धस यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
* खो,खो संघाचे कर्णधार प्रियंका इंगळे हिचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.