व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा : पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे

0

बीड। प्रतिनिधी
प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज प्रगती सभागृहात जिल्हयातील अवैध वाळू व तत्सम गौण खनिज उत्खणनामुळे होणारा पर्यावरणाचा –हास, बीड जिल्हयातील अवैध डोंगर पोखरल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी तसेच औष्णिक वीज प्रकल्प, परळी येथे होणा-या राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण आदी विषयांवर ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

वीट भट्यासाठी मोकळया हायवामधून होणा-या अवैध वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे तसेच खाली सांडलेल्या राखेमुळे वातवरणीय बदल रोखण्यासाठी बंद हायवामधून ही वाहतूक होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

*राखेचे साठे सील करा*
——-
चिमणीपासूनचे प्रदुषण नियत्रंणात असले तरी राख उचलणे हे संबधित अधिका-यांचे दायित्व आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राखेचे अनाधिकृत साठे सील करावेत. वाहतुकीचे नियम सर्वानी पाळावेत, राखेची वाहतुक गावातुन न करता ती बायबासनी करावी. दाऊतपूर एरियामध्ये किती राख आहे. याचे रेकार्ड ठेवणे राखेचा साठा आजमितीला आहे तेवढाच पुढील तपासणीपर्यंत असायला हवा नसता संबधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही याप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

*जप्त केलेली वाळू घरकुलासाठी उपलब्ध करून द्या*
——-
अवैध गौणखणिज वाहतुक
वाळू,दगड,माती,मुरुम इत्तर खडी याची अवैध वाहतूक करणा-या किती लोकांवर कारवाई केली तसेच वाळू घाटाची संख्या किती. जप्त केलेली वाळू ही पंडीत दीन दयाळ उपाध्याय घरकूल योजनेसाठी वापरावी. गौण खणिजाचे अवैध उत्खणनावर प्रतिबंध घालावा असेही यावेळी त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.