व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक

0

छत्रपती संभाजीनगर I प्रतिनिधी
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अजिंठा अर्बन बँकेत 97 कोटी 41 लाख रुपयांच्या घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर सीटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पोलिस झांबड यांचा शोध घेत होते. मात्र झांबड फरार होते. दरम्यान आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.