व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावं आणि वाद मिटवावा : मनोज जरांगे

0

मुंबई I वृत्तसंस्था
करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय काल वांद्रे न्यायालयाने काल दिला. दरम्यान यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावं आणि वाद मिटवावा असे जरांगे यांनी म्हटले आहे.

वांद्रेतील कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना १,२५,००० आणि मुलगी शिवानी मुंडे यांना ७५,००० ची पोटगी देण्याचा अंतरिम निकाल दिला. कोर्टाने करूणा शर्मा यांना दिलासा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावं आणि वाद मिटवावा. करूणा मुंडेंचा वनवास संपवला पाहिजे असं म्हणत करूणा शर्मा यांना न्याय द्या नाहीतर कर्माची फळं वाईटपणे भोगावे लागतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केली. तर तुमच्या कौटुंबिक वादात आम्हाला पडायचं नाही तुम्ही तिला न्याय द्या, वाद मिटवा आणि घरी घेऊन जा असा सल्लाही मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.