माझं तोंड बंद करण्यासाठी पाहुण्यांची नावे तडीपारीच्या यादीत लावले : मनोज जरांगे
जालना । प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह नऊ आरोपींना तडीपार करण्यात आले. या प्रकरणी मनोज जरांगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. माझं तोंड बंद करण्यासाठी माझ्या पाहुण्यांची नावे तडीपारीच्या यादीत टाकली आहेत. ही खेळी मुख्यमंद्धी देवंेंद्र फडणवीस यांची असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यात वाळू माफिया व अट्टल गुन्हेगारांविरोधात प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली. खेडकर यांच्यासह केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी जरांगे म्हणाले की, चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही…पाहुण्यांचा तर विषय संपला, असं मनोज जरांगे म्हणाले. खेडकर यांच्यावर अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.