व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही : आ.सुरेश धस

0

नाशिक । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एसआयटीने आका वाल्मिक कराड याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंडे यांच्याच पक्षातील आमदार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एवढेच काय तर अनेक संघटनांचीही तीच मागणी आहे. मात्र मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही असे आमदार सुरेश धस नाशिक येथे म्हणाले.

करुणा शर्मा किंवा अंजली दमानिया काय म्हणाल्या या पेक्षा देशमुख हत्येचा तपास महत्वाचा आहे. एसआयटीची आकापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणी तपास सुरु असुन यात धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई हाेईल. देशमुख हत्या प्रकरणाची कारवाई पुढे गेल्यावर मी बोलेन असेही धस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.