कराड याच्या अटकेनंतर परळीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला : आ. सुरेश धस
नाशिक । प्रतिनिधी
वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर खरोखरच परळीतील व्यापारी आिण नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असे आमदार सुरेश धस प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
परळीत रोज संध्याकाळी वाल्मिक कराड आिण त्यांच्या पिलावळींची दादागिरी सुरु होती. एवढी वर्षे परळीतील व्यापारी हे सर्व सहन करत गुंडांच्या दहशातीखाली रहात होते. यामुळे परळीतील 500 व्यापारी घरदार सोडून निघून गेले होते. आकाची गुंडगिरी इतकी होती की, ते लोकांची घरं पाडून तिकडे स्वत:ची मालकी प्रस्थापित करायचे. मात्र, आता वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर परळीतील जनतेने आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे असे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले.