कृष्णा आंधळे कुठेही गेला तरी सापडेल, आमचा गृहविभागावर पूर्ण विश्वास : आ.धस
नाशिक । प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य तपास सुरू आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा िकतीही फरार होऊन द्या, तो कुठेही गेला तरी सापडेल. आमचा गृहविभागावर पूर्ण विश्वास असे आमदार सुरेश धस नाशिक येथे म्हणाले.
देशमुख हत्या प्रकरणातील अद्यापही फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरतीची तयारी करत होता. नंतर तो गुन्हेगारीकडे वळाला. त्या कुटुंबाशी काही देणे घेणे नसून तो सायको झाला आहे. आतादेखील तो राज्याबाहेर लपून बसला असेल. तो काही नामचीन गुंड नाही. कधीतरी तो पकडला जाईल. कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलीस आणि गृहविभागावर पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख यांचे मारेकरी फाशीवर जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले.