उध्दव ठाकरेंना पुन्हा धक्का; राजन साळवी शिंदे गटात जाणार
मुंबई । प्रतिनिधी
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोकणातील मोठे प्रस्थ असलेले आिण ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित झाला असून १३ फेब्रुवारीला ते शिंदे गटात प्रवेश करतील असे बोलले जात आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
राजन साळवी हे काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राज्यभर सुरु झाल्याने साळवी यांनी याबाबत ठाकरेंसोबत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता पुन्हा साळवींच्या शिंदे गटात प्रवेशाबाबत चर्चा सुरु असून राजन साळवी यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 13 फेब्रुवारीला राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा पक्षप्रवेश लांबला होता त्यानंतर आता अखेर 13 फेब्रुवारी चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. राजन साळवी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोकणाकडून मुंबईकडे रवाना होत आहेत.