सांगलीमध्ये एकनाथ शिंदेंचा पुतळा उभारणार
सांगली । प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगलीमध्ये भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतील एका शिवसैनिकांनी त्यांना ही अनोख भेट दिली आहे. पुढील वाढदिवसापर्यंत शिंदे यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होईल असे सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी सांगितले.
राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे पुतळे त्यांच्या निधनानंतर उभारण्यात आले आहेत. मात्र नेत्यांच्या हयातीत पुतळा उभारला जावा यासाठी सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे.