व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात १० लाख भगवद्गीतांचे मोफत वाटप; आष्टीच्या पत्रकारांना लाभ

धार्मिक ग्रंथांच्या प्राप्तीने आम्ही धन्य झालो-प्रा.डॉ.विनोद ढोबळे

0

प्रयागराज click2ashti-प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात विविध भाषेतील” यथार्थ गीता ” १० लाख प्रति मोफत वाटप केल्या.आष्टी तालुक्यातील पत्रकारांनाही ” ययार्थ गीता ” वाटप केल्या गेल्या असून भगवत गीता या अत्यंत पवित्र भूमीत प्राप्त झाल्याने बीड जिल्ह्याच्या या पत्रकार बांधवांच्या आनंदाला उधाण आले! प्रयागराज येतील महा कुंभमेळ्यासाठी देशासह जगातील भाविक मोठ्या पवित्र भावनेने मार्गस्थ होताना दिसत आहेत.महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील ही अनेक विविध क्षेत्रातील गुनीजन या पवित्र ठिकाणी मोठ्या आस्थेने नतमस्तक होण्यासाठी जात आहेत.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकारिता या माध्यमिक क्षेत्रातील आष्टी तालुका पत्रकार संघाचे विविध मान्यवर पत्रकार पदाधिकारी आणि सदस्य गेल्या तीन दिवसापासून या दौऱ्यावर आहेत.या सर्व ज्ञानार्जन आणि लेखणी क्षेत्रातील अभ्यासकांना महाराष्ट्र एकता फाउंडेशनचे शेवगाव तालुका कोषाध्यक्ष तथा सूत्रसंचालक प्रा.बिभिषण चाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.विविध धार्मिक स्थळे ऐतिहासिक स्थळांबरोबरच येथील कला कौशल्य तेथील अध्यात्मिक भावनांचा आशीर्वाद,हिंदू धर्म व्यवस्थेतील अत्यंत पवित्र ग्रंथांची उपलब्धता या अनेक माध्यमातून हा दौरा यशदायी आणि फलदायी ठरत असल्याच्या भावना भ्रमणध्वनी वरून पत्रकारांनी बीड वासियांना कळवल्या आहेत.प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज रविवारी येथील अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी आनंद विभुषीत स्वामी आडगडानंदजी महाराजांच्या हस्ते विविध भाषेतील “यथार्थ गीता” या पत्रकार बांधवांना मिळण्याचे भाग्य मिळाले हे धार्मिक ग्रंथ मिळण्याचा योग आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे अशा भावना या पत्रकारांच्या चमुतील जेष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. विनोद ढोबळे यांनी व्यक्त केल्या आहेत.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,दत्ताभाऊ काकडे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे,विनोद ढोबळे,भीमराव गुरव,शरद तळेकर,शरद रेडेकर,रघुनाथ कर्डिले,गणेश दळवी,संतोष सानप,सचिन रानडे,मनोज पोकळे आदीसह पदाधिकारी,सदस्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.