ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे निधन
मुंबई । प्रतिनिधी
आपल्या साहित्यातून ग्रामीण भागातील वास्तव चित्र मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते 84 वयाचे होते.
साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांना पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार म्हणून ओळख मिळाली होती. ५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली होती. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगावमध्ये झाला. गावातच त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. मग माढा, बार्शी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरातून शिक्षण पूर्ण केले. मंगळवारी वयाच्या ८४ वर्षीय निधन झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ग्रामीण भागाशी नाते कायम राहिले. त्यामुळे त्यांच्या लेखनात ग्रामीण साहित्य दिसून आले. १९५७ मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला होता.