शिकावू वाहनचालकाचा ताबा सुटला, कार विहिरीत कोसळलून तिघांचा मृत्यू
नागपूर । प्रतिनिधी
कार चालवणे शिकणाऱ्या मुलाचा गाडीवरचा ताबा सुटून गाडी रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरीत पडून तीघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री घडली.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस, स्थानिक नागरिकांनी बचावकार्य रात्रभर सुरू ठेवले. शर्थीचे प्रयत्न करून विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली, मात्र त्याआधीच तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. अपघातावेळी तरुणांपैकी एक कार चालवणे शिकत होता आणि त्यादरम्यान वाहनाचा ताबा सुटला. या घटनेमुळे बुटीबोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने कठडा नसलेल्या विहिरींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.